विठुरायाचीवाडीतील खून प्रेमाच्या त्रिकोणातून, दोघा संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 04:54 PM2022-06-04T16:54:30+5:302022-06-04T16:55:14+5:30

बनाप्पा हा प्रेयसीला भेटायला जाणार होता. प्रेयसीला भेटण्यास जाण्यापूर्वी त्याचा काटा काढला

Murder in Vithurayachiwadi from the love triangle, Two suspects remanded in police custody for seven days | विठुरायाचीवाडीतील खून प्रेमाच्या त्रिकोणातून, दोघा संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

विठुरायाचीवाडीतील खून प्रेमाच्या त्रिकोणातून, दोघा संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

Next

कवठेमहांकाळ : विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बनाप्पा म्हार्नुर खूनप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, प्रेमाच्या त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित रॉबिन श्रीकांत खोत (वय २५, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) व संजय आप्पा गगणमहाले (वय ३३, रा. थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित रॉबिन खोत याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मृत बनाप्पा हा रॉबिनचा मित्र असल्याने तो त्याच्यासोबत सतत असायचा. परंतु काही दिवसापूर्वी बनाप्पाचे आपल्या प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रॉबिनला आला. त्यामुळे रॉबिन हा बनाप्पावर चिडून होता. त्याने बनाप्पाचा काटा कायमचा काढायचे ठरवले.

गुरुवारी बनाप्पा हा प्रेयसीला भेटायला जाणार होता. त्यासाठी त्याने नवीन कपडे घातले होते. गुलाबाचे फूलही घेतले होते. प्रेयसीला भेटण्यास जाण्यापूर्वी रॉबिन, संजय यांच्यासोबत बनाप्पा जत- कवठेमहांकाळ रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये दारू पीत बसला.

त्यानंतर सव्वाअकराच्या दरम्यान सर्वजण हॉटेलमागे असणाऱ्या बंद मिलकडे गेले. तेथे रॉबिन व संजयने त्याला जाब विचारत पोटात, छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात रक्तबंबाळ हाेऊन बनाप्पा खाली पडला. त्यानंतर दोघांनी एक माेठा दगड त्याच्या डाेक्यात घालून चेहऱ्याचा चेंदामेंदा केला आणि घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांनी तपासाला गती देत दाेघांनाही अलकुड एस येथे ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून बनाप्पाचा खून केल्याचे रॉबिन याने कबुली जबाबात सांगितले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने करीत आहेत.

Web Title: Murder in Vithurayachiwadi from the love triangle, Two suspects remanded in police custody for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.