तुंगजवळ सातवर्षीय मुलीवर अत्याचार करून खूनाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:50 AM2020-05-21T11:50:55+5:302020-05-21T12:11:33+5:30
मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
तुंगजवळील चांदोली वसाहत असलेल्या विठलाईनगरमध्ये इयत्ता पहीलीमध्ये शिकणारी ही मुलगी बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. कुटूंबियांकडून तिचा शोध सुरू होता.
अखेर गुरूवारी सकाळी घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावरील उसाच्या शेतात चारशे ते पाचशे फूट अंतरावर आतमध्ये तिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथकही मागविण्यात आले आहे.