सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून, तुंग प्रकरणाचा तपास गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:41 PM2020-05-23T12:41:09+5:302020-05-23T12:44:12+5:30

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे.

 Murder of seven-year-old girl tortured, Tung case being investigated speedily | सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून, तुंग प्रकरणाचा तपास गतीने

सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून, तुंग प्रकरणाचा तपास गतीने

Next
ठळक मुद्देतुंग प्रकरणाचा तपास गतीने सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे.

दिवसभर पथक चौकशीसाठी कार्यरत होते. दरम्यान, या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयितांकडेही कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लावण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

तुंगजवळील विठलाईनगर येथे पहिलीत शिकणारी सात वर्षांची मुलगी बुधवारी सायंकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. पण ती बराचवेळ न आल्याने कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी तिची शोधाशोध सुरू केली होती.

अखेर गुरूवारी सकाळी एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांसह इतर पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.

लहान मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनीही गावात भेट देत पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी पुन्हा एकदा परिसर पिंजून काढत तपासाला गती दिली. काहीजणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात येत असून लवकरच या गुन्ह्याचा छडा लावू, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title:  Murder of seven-year-old girl tortured, Tung case being investigated speedily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.