आरेवाडीतील तरुणीचा खून वडिलांकडून! पतीला सोडून प्रियकराकडे राहत असल्याने कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:21 PM2018-03-16T22:21:26+5:302018-03-16T22:21:26+5:30

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या प्रियांका काशीनाथ हाक्के (वय २०, तळसंदे, ता. हातकणंगले) या विवाहितेच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना शुक्रवारी यश आले.

Murdered murderer of Aarevadi! Due to staying away from her husband, she loved the beloved | आरेवाडीतील तरुणीचा खून वडिलांकडून! पतीला सोडून प्रियकराकडे राहत असल्याने कृत्य

आरेवाडीतील तरुणीचा खून वडिलांकडून! पतीला सोडून प्रियकराकडे राहत असल्याने कृत्य

googlenewsNext

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या प्रियांका काशीनाथ हाक्के (वय २०, तळसंदे, ता. हातकणंगले) या विवाहितेच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना शुक्रवारी यश आले. वडिलांनीच तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी वडील हणमंत ज्ञानोबा खांडेकर (वय ३९, रा. खोतवाडी, ता. हातकणंले) यास अटक केली आहे.

वर्षापूर्वी प्रियांकाचा तळसंदे येथील काशीनाथ हाक्के याच्याशी विवाह केला होता. पण प्रियांका पतीला सोडून खोतवाडीतील तिचा प्रियकर अंबादास कुंभार याच्याकडे जात असे. अनेकदा समजावून सांगूनही प्रियांका प्रियाकरासोबत असलेले संबंध तोडण्यास तयार नव्हती. नातेवाईकांमध्ये बदनामी होईल, या भितीने तिचा खून केल्याची कबूली संशयित हणमंत खांडेकर यांनी दिली आहे. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यास शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.

प्रियांका हाक्के हिचा चार दिवसापूर्वी आरेवाडीत दगडाने ठेचून खून केल्याची उघडकीस आले होते. सुरुवातीला तिची ओळख पटली नव्हते. घटनास्थळी दुचाकी (क्र. एमएच ०९ बीएच-१२४२) सापडली होती. यावरुन तपासाला दिशा देण्यात आली होती. आरटीओ कार्यालयातून या दुचाकीचा मालक शोधल्यानंतर तो हणमंत खांडेकर निघाला. त्याला दोन दिवसापूर्वी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रथम प्रियांकाच्या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर खांडेकरने स्वत:च्या मुलीचा दगडाने ठेचून खून केल्याची कबूली दिली. वर्षापूर्वी प्रियांकाचा विवाह केला होता. विवाहानंतरही तिने प्रियाकरासोबत संबंध सुरुच ठेवले. तिला अनेकदा समजावून सांगितले. पण तिच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. पतीचे घर सोडून ती प्रियकराकडे अनेकदा जात होती. पंधरा दिवसापूर्वीही ती प्रियाकडे गेल्याने पतीने तिला नांदविण्यास नकार दिला होता. नातेवाईकांमध्ये मुलीने बदनामी केली. दुसरे लग्न लाऊन दिले तर पुन्हा तिचे असेच वर्तन राहिल, असा विचार करुन खांडेकरने तिचा खून केल्याची निष्पन्न झाले आहे.

सांगलीतून नेले
आठवड्यापूर्वी प्रियांकाला सांगलीत संजयनगरमधील अभिनंदन कॉलनीत राहणारे चुलते चंद्रकांत खांडेकर यांच्याकडे सोडले होते. घटनेदिवशी वडिलांनी तिला परगावी जायचे आहे, असे सांगून दुचाकीवरुन शिरढोणला आणले. तिथे त्यांनी नाष्टा केला. वडील हणमंतने मद्य प्राशन केली. तेथून आरेवाडीतील बिरोबा बनात गेले. हणमंतने झोपल्याचा बहाणा केला. प्रियांकाही गाढ झोपेत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला.

Web Title: Murdered murderer of Aarevadi! Due to staying away from her husband, she loved the beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.