सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:46 PM2022-09-26T12:46:27+5:302022-09-26T12:46:57+5:30

‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, त्यामुळे तुला आता सोडत नाही’ असे म्हणत मारहाण

Murderous attack on young man on suspicion of having police information, The incident at Takari in Walwa taluka sangli District | सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना

सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना

Next

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथे ‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, थांब तुला आता ठारच मारून टाकतो’ म्हणून पाचजणांच्या टोळक्याने संदीप वीरसिंग जाधव या युवकाला चाकूने भोसकून आणि लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवार, दि. २३ रोजी दुपारी घडला. यातील गंभीर जखमी युवकावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा युवक पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते.

याबाबत जखमी संदीप याची आई सुवर्णा वीरसिंग जाधव (रा. तुपारी, गोसावी वसाहत, ता. पलूस) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रांत बापू क्षीरसागर, प्रतीक जगन्नाथ क्षीरसागर, आशिष उत्तम क्षीरसागर, अक्षय जगन्नाथ क्षीरसागर आणि बंड्या (सर्व रा. ताकारी) या हल्लेखोरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संदीप जाधव हा शुक्रवारी ताकारी येथे आला होता. यावेळी कालव्याच्या परिसरात या हल्लेखोरांनी त्याला गाठून ‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, त्यामुळे तुला आता सोडत नाही’ असे म्हणत त्याला मारहाण सुरू केली. विक्रांत याने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढत त्याच्यावर वार केले. याचवेळी इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच विटा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, इस्लामपूरचे निरीक्षक चव्हाण आणि सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Murderous attack on young man on suspicion of having police information, The incident at Takari in Walwa taluka sangli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.