Sangli Crime News: किरकोळ कारणावरून होताहेत खून, जीवावर उठणाऱ्यांना आवरणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:39 PM2022-03-24T12:39:21+5:302022-03-24T12:39:58+5:30

‘राग आणि भीक माग’ ही एक म्हण. पण याच रागातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. हरिपूर येथे दुचाकी व्यवहारातील वादातून हल्ला करून खून तर हॉटेलमधील वादातून मंगळवारी सायंकाळी झालेला तरुणाचा खून यामुळे सांगली चांगलीच हादरली.

Murders happen for trivial reasons, who will cover those who rise to life in sangli | Sangli Crime News: किरकोळ कारणावरून होताहेत खून, जीवावर उठणाऱ्यांना आवरणार कोण?

Sangli Crime News: किरकोळ कारणावरून होताहेत खून, जीवावर उठणाऱ्यांना आवरणार कोण?

Next

सांगली : ‘राग आणि भीक माग’ ही एक म्हण. पण याच रागातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. हरिपूर येथे दुचाकी व्यवहारातील वादातून हल्ला करून खून तर हॉटेलमधील वादातून मंगळवारी सायंकाळी झालेला तरुणाचा खून यामुळे सांगली चांगलीच हादरली. याशिवाय अगदी किरकोळ कारणावरूनही मारामारीच्या घटना घडत असल्याने या तरुणांना आवर घालणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.

दुचाकीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हरिपूर येथे सुरेश आण्णाप्पा नांद्रेकर या आरटीओ एजंटाचा निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकी व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीतून चार संशयितांनी हे कृत्य केलेे. यातील मृत व संशयित दोघेही परिचित असल्याने तोडगा निघू शकत होता मात्र, संशयितांनी थेट लाेखंडी रॉडने हल्ला करून खून केला.

या प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून अटक होते ना होते तोच शहरातील आंबेडकर रस्त्यावर रोहन रामचंद्र नाईक या तरुणाचा शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सिव्हील हॉस्पिटल ते बसस्थानक मार्गावरील एका हॉटेलमध्ये तो त्याच्या मित्रासह बसला असताना, तेथे बसलेल्या चार संशयितांशी झालेल्या वादावादीतून हल्ला करून हा खून करण्यात आला.

पोलिसांसमोर आव्हान

सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले असून, हरिपूर येथील खुनातील संशयितांना अटक केली आहे तर सांगलीतील संशयितांचा शोध सुरू आहे. यासह किरकोळ कारणावरून हत्याराने वार करणे, मारहाण करणे अशा घटनाही घडत आहेत.

मारायला लागत नाही कारण

रस्त्यावरून जाताना सहज बघितले तरी वाकडे बघितलास, दुचाकीवरून जाताना मला ओव्हरटेक केलास का यासह क्षुल्लक कारणावरून अनेक तरुण मारामारी करत आहेत. त्यातही नशेच्या आहारी गेलेले तरुण अधिक आक्रमक होत काहीही करायला तयार असल्याने त्यांना आवर घालणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Web Title: Murders happen for trivial reasons, who will cover those who rise to life in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.