आगळगाव येथे आढळले कस्तुरी मांजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:25+5:302021-02-14T04:24:25+5:30

आगळगाव रस्त्यावर नागरिकांना हे मांजर आढळून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती कवठेमहांकाळ येथील कृषी सहायक संजय घुले यांना ...

Musk cat found at Agalgaon | आगळगाव येथे आढळले कस्तुरी मांजर

आगळगाव येथे आढळले कस्तुरी मांजर

Next

आगळगाव रस्त्यावर नागरिकांना हे मांजर आढळून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती कवठेमहांकाळ येथील कृषी सहायक संजय घुले यांना दिली. घुले यांनी ही माहिती वनविभागाला कळवली. त्यांनतर कृषी सहायक घुले यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या मांजराला पकडले व वनविभागाच्या हवाली केले.

हे मांजर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आगळगावचे पोलीसपाटील रणजित पाटील, सूरज मोहिते, संतोष चौरे, विलास शिंदे यांनी या कस्तुरी मांजराला पकडण्यात मदत केली.

याला ‘जवादी मांजर’ असेही म्हणतात. मांसाहारी गणातील व्हायव्हेरिडी कुलातल्या व्हायव्हेरिक्युला वंशाचा हा प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव व्हायव्हेरिक्युला इंडिका आहे. या वंशात ही एकच जाती असून ती भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, दक्षिण चीन व मलाया येथे आढळते. यांच्या जननेंद्रियांच्या जवळ असणाऱ्या कस्तुरी ग्रंथींपासून उत्पन्न होणारी कस्तुरी काढून घेण्याकरिता पुष्कळ लोक ही मांजरे पाळतात. तंबाखू सुवासिक करण्याकरिता बहुधा या कस्तुरीचा उपयोग करतात. प्राणिमित्रांच्या माहितीनुसार याची बऱ्याचदा तस्करीही केली जाते. यातील सुगंधी ग्रंथींचा वापर सुगंधी द्रव्यनिर्मितीसाठी केला जातो.

चौकट

काय आहेत वैशिष्ट्ये

या प्राण्याची डोक्यासकट शरीराची लांबी ४५–६५ सेंमी. आणि शेपटीची लांबी ३०–४५ सेंटीमिटर असते. केस राठ व विस्कळीत असतात. शरीराचा रंग पिवळसर, तपकिरी किंवा करडा असून पाय काळे असतात. पुढच्या भागावर लहान आणि कमरेवर मोठे काळे ठिपके असतात. पाठीवर ६ ते ८ लांब काळे पट्टे असतात.

फोटो-१३कवठेमहांकाळ१

Web Title: Musk cat found at Agalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.