सांगलीत ‘माझे चर्च, माझी जबाबदारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:37+5:302020-12-12T04:41:37+5:30
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सण सर्व चर्चेस व ख्रिस्ती बांधवांनी साधेपणाने साजरा करावा. यादिवशी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी न ...
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सण सर्व चर्चेस व ख्रिस्ती बांधवांनी साधेपणाने साजरा करावा. यादिवशी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी न करता ‘माझे चर्च, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बेथेसदा प्रार्थना केंद्र व शांतिसागर उपासना केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष रेव्ह. अशोक सीताराम लोंढे यांनी केले आहे.
लोंढे म्हणाले, भारतासह जगावर कोरोनाचे संकट आले आहे. सध्या कोरोना आटोक्यात आला असला, तरी पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे शासनाच्या सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून चर्चमध्ये व घरी ख्रिसमस साजरा करावा. यासाठी ‘माझे चर्च, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवावी. यात चर्चचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर, ६० वर्षांवरील वृध्द व १० वर्षाखालील मुलांना चर्चमध्ये प्रवेश न देणे तसेच शंभरपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देऊ नये. या नियमांचे काटेकोर पालन करत ख्रिसमस साधेपणाने साजरा करावा. पास्टर, पालकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोंढे यांनी केले आहे.