माढ्यातील माय-माऊली हीच माझी ताकद--सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:33 PM2017-09-28T22:33:08+5:302017-09-28T23:07:04+5:30

My mother in my heart is my strength - Sadabhau Khot | माढ्यातील माय-माऊली हीच माझी ताकद--सदाभाऊ खोत

माढ्यातील माय-माऊली हीच माझी ताकद--सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्दे कोणीही पुढे आले तरी, त्याला हरवणारच; इस्लामपुरात ‘रयत क्रांती’चा महिला सन्मान मेळावामाझ्या संघर्षाच्या काळात माढ्यातील मायमाऊली दुर्गामाता बनून माझ्या पाठीशी उभी राहिल्याने

:लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : केवळ माढ्याची ताकद माझ्या पाठीशी असल्याने अनेक वादळांशी झुंज दिली. चळवळीतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माढ्यातील माय-माऊलीनेच राजकारणातील पटलावर जन्माला घातले. माढ्यातील जनता माय-माऊली हीच माझी ताकद आणि वैभव आहे. त्यामुळे कोणीही पुढे आले तरी त्याला मी हरवू शकतो. माझ्या संघर्षाच्या काळात माढ्यातील मायमाऊली दुर्गामाता बनून माझ्या पाठीशी उभी राहिल्याने मला हत्तीचे बळ मिळाले आहे, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
येथील गांधी चौकात रात्री उशिरा रयत क्रांती महिला आघाडीच्यावतीने माढा लोकसभा मतदार संघातील ५ हजारहून अधिक महिलांनी नवरात्रीनिमित्त आणलेल्या अंबाबाई मशालीचे स्वागत करण्यात आले. या महिला सन्मान मेळाव्यात खोत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जि. प.च्या महिला बालकल्याण समिती सभापती सुषमा नायकवडी, रणजित नाईक-निंबाळकर, श्रीकांत घाटगे, सागर खोत, भास्कर कदम, विजय पवार, नगरसेविका कोमल बनसोडे, सुभाष शिंगण, अशोक खोत, संदीप खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
खोत म्हणाले, काहींना वाटत होते, सदाभाऊ एकटा आहे. माढ्यातील ५00 कार्यकर्तेही बरोबर येणार नाहीत. मात्र आज भर पावसाळी वातावरणात पाचशेच काय, पाच हजारहून अधिक माय-माऊली, रणरागिणी माझ्याबरोबर आहेत. माझ्या वाढत्या ताकदीमुळे शत्रूंबरोबरच आप्तस्वकीयांच्या पोटात दुखत आहे. त्यांनी माझ्यावर कपटाने वार केले आहेत, असा हल्ला खा. शेट्टी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी केला. या रणरागिणींच्या सोबतीने कपट कारस्थान करणाºयांचा पराभव करणार आहे.
काही लोक मातीतल्या माणसाचे नाव घेऊन मातीत राबणाºया माणसांना मातीत घालण्याचे काम करत आहेत. मलाही मातीत घालण्याची भाषा त्यांच्याकडून होत आहे. मात्र अशांना या रणरागिणीच उत्तर देतील. मातीतल्या माणसाला, त्याच्या घामाला सन्मान मिळवून देण्याचे काम रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून, सत्तेपेक्षा माढ्यातील माय-माऊलींचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर माढ्यात दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून राज्यातील रयतेचे भले व्हावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी माढ्यातील या महिला, भगिनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालून आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. या आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी निश्चित स्वरुपात काम केले जाईल.
सुषमा नायकवडी म्हणाल्या, शेतकरी, कष्टकºयांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत शासनामध्ये काम करत आहेत. सरकारमध्ये राहून ते समाजातील सर्व घटकांना न्याय देत आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिलांनी मजबूत संघटन करुन शासनाच्या महिलांविषयक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा.
सागर खोत यांनी स्वागत केले. रयत क्रांती आघाडीच्या माध्यमातून शेतकºयांच्या प्रश्नांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका कोमल बनसोडे यांनी आभार मानले.

वेळ पडली तर किडनी देईन..!
चळवळीतील कार्यकर्ते आणि माढ्यातील माय-माऊलींच्या आशीर्वादाने मी सत्तेत आहे. तुम्हा सर्वांसाठी सदाभाऊचे दार सताड उघडे आहे. माढ्यातील एकही माणूस वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही. तुम्ही मला कधीही हाक मारा, हा सदाभाऊ तुमच्यासाठी धावून येईल. वेळ पडली तर माझ्या किडन्यासुध्दा द्यायला मी मागे-पुढे पाहणार नाही, अशी भावूक साद सदाभाऊंनी घातली.
रणरागिणींना फेटे..!
गांधी चौकातील मेळाव्यासाठी आलेल्या प्रत्येक माय-माऊलीला फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. पावसामुळे विस्कळीत झालेला हा मेळावा माढ्यातील माता-भगिनींच्या अलोट उत्साहात झाला. सदाभाऊंप्रती असणाºया कृतज्ञतेची झालर या मेळाव्याला होती.

Web Title: My mother in my heart is my strength - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.