मणेराजुरीतील तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम, उलटसुलट चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:08 PM2021-12-25T13:08:21+5:302021-12-25T13:09:35+5:30

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी पहाटे एका युवकासह दोन तरुणींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती.

The mystery of the triple suicide in Manerajuri remains in sangli district | मणेराजुरीतील तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम, उलटसुलट चर्चा

मणेराजुरीतील तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम, उलटसुलट चर्चा

googlenewsNext

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी पहाटे एका युवकासह दोन तरुणींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाचे गूढ शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम हाेते. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा आहे.

हरिष हणमंत जमदाडे (वय २१, रा. मणेराजुरी), प्रणाली उद्धव पाटील (१९, मूळ रा. जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. मणेराजुरी) आणि शिवानी चंद्रकांत घाडगे (१९, रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. पाेलिसांना घटनास्थळी शिवानी घाडगे हिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाली हाेती. दरम्यान, तिच्या हातीद येथील घरीही आणखी एक चिठ्ठी सापडली आहे. तपासाच्यादृष्टीने त्यातील मजकूर गाेपनीय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिवानी ही गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत हातीद येथे तिच्या घरी असल्याचे समाेर आले आहे. त्यानंतर पहाटे सहा वाजता ती मणेराजुरीतील शेकाेबा डोंगरावर मृत अवस्थेत आढळली. शिवानी तीन तासात हातीदमधून मणेराजुरीत कशी आली,, तिला कुणी आणले, हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून, या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाला गती दिली आहे. या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, असे तासगाव पोलिसांनी सांगितले.

प्रेमप्रकरणाची चर्चा अन् तिहेरी आत्महत्येमुळे संशयकल्लोळ

हातीद येथील शिवानी घाडगे या तरुणीचे मणेराजुरी येथील नात्यातीलच अन्य एका तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे, तर आत्महत्या केलेल्या हरिष जमदाडे आणि प्रणाली पाटील यांचेही प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही एकाच वेळी एक तरुण आणि दोन तरुणींनी आत्महत्या केल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: The mystery of the triple suicide in Manerajuri remains in sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.