‘एन ए’ परवाने पालिकेकडे मार्गस्थ

By admin | Published: December 14, 2014 11:00 PM2014-12-14T23:00:10+5:302014-12-14T23:49:56+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : रात्री उशिरापर्यंत प्रमाणपत्रांचे काम

'NA' permits pilot | ‘एन ए’ परवाने पालिकेकडे मार्गस्थ

‘एन ए’ परवाने पालिकेकडे मार्गस्थ

Next

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रखडलेली बिगरशेती प्रस्तावाची कामे शनिवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आली असून, हे प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बिगरशेती आढावा बैठकीत वादंग झाले होते. अनावश्यक ‘ना हरकत’ दाखले व कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक व बिगरशेतीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्यांनी केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत ५५ पैकी २७ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जे ‘ना हरकत परवाने’ रखडले होते, त्यांची तात्काळ निर्गती करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील दहा ते बारा कर्मचारी शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते. यामधील ३२ बिगरशेती प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कुशवाह यांच्यापुढे सादर करण्यात आले. सुट्टी असतानाही कुशवाह यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून सर्व प्रस्तावांवर सह्या करून यांना अंतिम मंजुरी दिली.
मंजूर करण्यात आलेले बिगरशेतीचे प्रस्ताव आता उद्या (सोमवार) महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर बिगरशेतीच्या जमिनीमध्ये बांधकामाला परवाना मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बिगरशेतीचे प्रस्ताव रखडले होते. यासाठी सोळाहून अधिक विभागांचे ‘ना हरकत’ परवाने लागत असल्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत गोंधळ झाला होता. यावेळी प्रत्येक प्रस्तावांची छाननी करण्यात आली. यामधील ५५ प्रस्तावांपैकी २७ प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या, तर पाचमध्ये काही परवाने आवश्यक असल्याचे आढळून आले होते. यासाठी लागणारे परवाने नागरिकांनी आणून दिले. त्यानंतर ३२ प्रस्तावांचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण करण्यात आले. आता हे प्रस्ताव उद्या (सोमवार) महापालिकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)


दिलेले वचन पाळले : कुशवाह
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या सर्व बिगरशेती परवान्यांची पूर्तता करून सोमवारपर्यंत ते महापालिकेकडे सादर करण्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी याची पूर्तता करून सोमवारी हे प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. यासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टीदिवशीही काम केले. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंतही काम केले.
उर्वरित बिगरशेतीचे प्रस्ताव पुन्हा नागरिकांकडे परत देण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे ना हरकत परवाने आता जोडावे लागणार आहेत.दिलेले वचन पाळले : कुशवाह
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या सर्व बिगरशेती परवान्यांची पूर्तता करून सोमवारपर्यंत ते महापालिकेकडे सादर करण्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी याची पूर्तता करून सोमवारी हे प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. यासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टीदिवशीही काम केले. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंतही काम केले.
उर्वरित बिगरशेतीचे प्रस्ताव पुन्हा नागरिकांकडे परत देण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे ना हरकत परवाने आता जोडावे लागणार आहेत.

Web Title: 'NA' permits pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.