नागजला महामार्गालगतचे घर पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:45+5:302021-02-05T07:18:45+5:30
घराची जागा न्यायप्रविष्ट असताना वसंत बाळू धोत्रे यांचे घर जमीनदोस्त केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने ...
घराची जागा न्यायप्रविष्ट असताना वसंत बाळू धोत्रे यांचे घर जमीनदोस्त केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पोलीसबळाचा वापर करून घरातील व्यक्तींना
जबरदस्तीने बाहेर काढून घर पाडल्याचे धोत्रे यांनी सांगितले.
वसंत धोत्रे यांचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत नागज फाट्याजवळ घर व कोल्ड्रिंक्सचे दुकान होते. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी प्रशासनाने लागणारी जागा संपादित केली होती. संपादित केलेल्या जागेच्या मागे घर बांधले असल्याचे धोत्रे यांचे मत आहे. मात्र, मूळ जमीन मालक व धोत्रे यांचा जमिनीचा वाद कवठेमहांकाळ येथील न्यायालयात सुरू आहे. असे असताना रस्ता प्राधिकरणाने रस्त्याची जागा अधिग्रहीत केल्याप्रमाणे (पिवळा पट्टा) तेथील जागा खाली करून दिली होती. त्या जागेची ऐंशी टक्के रक्कम धोत्रे यांना मिळाल्याचे धोत्रे यांनी कबूल केले आहे. मात्र, पिवळ्या पट्ट्याबाहेर असलेले घर व दुकान कुटुंबीयांना घराबाहेर काढून जमीनदोस्त केले आहे.
याबाबत रस्ता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, रस्त्याच्या कामात घर अडथळा ठरत होते, तसेच धोत्रे यांनी मोबदलाही घेतला आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देण्याची आवश्यकता नाही.