नागठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत

By admin | Published: October 19, 2015 10:59 PM2015-10-19T22:59:25+5:302015-10-19T23:49:28+5:30

काँग्रेस-भाजपचा सामना : राष्ट्रवादीची फरफट

Nagothane Gram Panchayat is contesting for a long time | नागठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत

नागठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत

Next

महेंद्र किणीकर- वाळवा पलूस तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ७९ अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. निवडणूक दुरंगी होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वी कॉँग्रेसमध्ये आल्याने, सध्या येथे कॉँग्रेसची १५-० अशी एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी एकत्रीत कॉँग्रेसशी लढत असल्याने पक्षीय पातळीवर नवी समीकरणे समोर येत आहेत.
कॉँग्रेसने या निवडणुकीतही पुन्हा तसेच यश संपादन करण्याच्या चंग बांधला आहे, तर भाजप-राष्ट्रवादीने नागठाणे ग्रामपंचायतीमधील सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे.
गेल्या पाच वर्षातील तीन ते पाच कोटी रुपयांची केलेली विकासकामे, यांच्या बळावरच कॉँग्रेस जनतेपुढे जात आहे.
कॉँग्रेसचे पतंगराव कदम विरुद्ध संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख अशाच तोफा धडाडणार आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकविताना अरुण लाड यांची फरफट होणार आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यामुळेच सवतासुभा न घेता भाजपसमवेत गेले आहेत. दि. २१ रोजी अंतिम चित्र समोर येणार आहे.


भाजपचा ‘प्लॅन बी’
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचा ‘भाजप’ प्रवेश न रुचल्याने अनेकजण कॉँग्रेसवासी झाले. ही पोकळी भरून काढताना भाजपने प्लॅन-बी तयार केला असून खा. संजय पाटील यांच्या निधीतून काही विकासकामे सुरू केली. गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, पाणंद रस्ते, बालगंधर्व स्मारक आणि बंद पडलेला पुरस्कार या प्रश्नांना हात घातला आहे.

Web Title: Nagothane Gram Panchayat is contesting for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.