नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:24+5:302021-07-23T04:17:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ होत असून, गुरुवारी सकाळी १० वाजता नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ होत असून, गुरुवारी सकाळी १० वाजता नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला. यावर्षी दुसऱ्यांदा हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागठाणे, वाळवा येथून नागराळे, शिरगाव, किर्लोस्करवाडी, पलूस येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
जून पहिल्या आठवड्यात पावसाने नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला होता. आता पुन्हा या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. कोटभाग सरकारवाडा नदीच्या काठावर असलेल्या सरकार स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. भंडारे समाधी स्थळाला पाण्याने वेढा घातला आहे. नदीतील खडकोबा मंदिर पाण्याखाली गेले आहे. हाळभाग जोडलेला जुना फरशीपूल पाण्याखाली आहे. येथील झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. गावातील अनेकांनी साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.