नागठाणे बंधारा सलग आठ दिवस पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:11+5:302021-08-01T04:25:11+5:30
वाळवा : पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे पलूस, किर्लोस्करवाडीला जाणारी वाहतूक ...
वाळवा : पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे पलूस, किर्लोस्करवाडीला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
नागठाणे बंधारा २३ जुलैला सकाळी ११ वाजता कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात पाण्याखाली गेला. आता पुराचे पाणी संथगतीने घटू लागले आहे. त्यामुळे अद्याप बंधारा वाहतुकीसाठी खुला नाही. यावरून वाळवा, नागठाणे ते शिरगाव, नागराळे, दुधोंडी, बुर्ली, किर्लोस्करवाडी, पलूस, कुंडलला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ही वाहतूक जुनेखेडजवळील पुणदी पुलावरून आणि अंकलखोप, मळीभाग-आमणापूर पुलावरून सुरू झाली आहे.
वाळवा येथील कोटभाग व हाळभाग जोडणारा जुना पूलही पाण्याखाली गेला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पिछाडीला पाणी आहे. लक्ष्मीनगर, हाळभाग येथे मगरींचा वावर वाढला आहे. जवळपास १३ मगरी या परिसरात आहेत. पुराचे पाणी ओसरले असले तरी पावसाची रिपरिप सुरू असल्याने रस्ते निसरडे आहेत. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात घडत आहेत.