नानांना धक्काबुक्की; पिस्तूल रोखले!

By admin | Published: February 20, 2017 11:44 PM2017-02-20T23:44:43+5:302017-02-20T23:44:43+5:30

तांबवेतील घटना : राजकीय धुमश्चक्री; रक्षकाच्या कृत्यानंतर गावात तणाव, बंदोबस्त तैनात

Nana beats; Pistols stopped! | नानांना धक्काबुक्की; पिस्तूल रोखले!

नानांना धक्काबुक्की; पिस्तूल रोखले!

Next



कऱ्हाड : तांबवे, ता. कऱ्हाड येथे आमदार आनंदराव पाटील व विरोधी गटाच्या उमेदवारासह त्यांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी आमदारांच्या सुरक्षारक्षकाने पिस्तूल रोखल्यामुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तांबवे गटातून आमदार आनंदराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर विरोधी कऱ्हाड विकास आघाडीकडून तांबवेतील प्रदीप पाटील निवडणूक लढवित आहेत. सोमवारी दुपारी आमदार पाटील हे त्यांच्या समर्थकांसह तांबवे येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी काहीजणांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचा आरोप करीत त्याला आक्षेप घेण्यासाठी प्रदीप पाटील व त्यांचे समर्थक रस्त्यावर आले. त्यांनी या प्रकाराबाबत आमदारांना जाब विचारला. त्यामुळे शाब्दिक चकमक उडाली. यादरम्यान धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर आमदारांच्या अंगरक्षकाने स्वत:जवळील पिस्तूल काढून जमावावर रोखली. त्यामुळे प्रदीप पाटील यांचे समर्थक आणखीनच संतप्त झाले. त्यांनी आमदारांसह त्यांच्या समर्थकांना घेराव घालण्यास सुरुवात केली. यावेळीही दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदार आनंदराव पाटील यांच्यासह तांबवेतील प्रदीप पाटील यांना कऱ्हाडला आणले.
या घटनेनंतर तांबवे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Nana beats; Pistols stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.