नंदू आबदारची दोरवडवर मात, श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:11 PM2020-01-18T18:11:04+5:302020-01-18T18:13:48+5:30
मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.
कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.
दुसऱ्या क्रमांकासाठी राजेंद्र सुळ विरुद्ध संतोष सुतार यांच्यात लढत झाली. यात संतोष सुतार याने एक गुण घेतल्याने त्यास पंचांनी विजयी घोषित केले. तिसºया क्रमांकाच्या लढतीत अविनाश पाटील यास राहुल सरक याने अकराव्या मिनिटाला समोरुन हप्ता डावाने चितपट केले.
कुस्ती मैदानाचे उद्घाटन सर्जेराव बेंगडे, दिनकर बाबर, यात्रा कमेटी अध्यक्ष महादेव आस्कट, उपाध्यक्ष संपत पाटील व यात्रा कमेटी यांच्याहस्ते करण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत विकास पाटील याने प्रशांत शिंदे याच्यावर झोळी डावाने विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाची सागर लाड विरुद्ध वैभव फलके यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
पंच म्हणून संपत जाधव, शिवाजी लाड, कुंडलिक गायकवाड, राहुल जाधव, तानाजी चवरे, संजय जाधव, शिवाजी गायकवाड यांनी काम पाहिले, तर सुरेश जाधव, मनोज चिंचोलकर यांनी समालोचन केले. पोपट सावंत, शिवाजी शिरसट, डॉ. अशोक आटुगडे, मनोज चिंचोलकर, राजू पाटील, शामराव पाटील, सुरेश बेंगडे, विकास शिरसट, कृष्णा आस्कट, संपत कडवेकर, बाळकृष्ण तोळसनकर यांनी संयोजन केले.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भूषण नाईक, माथाडी नेते बबनराव चिंचोलकर, संजय शिरसट, उद्योजक तानाजी पाटील, रामचंद्र शेंडे, विजय चव्हाण, तानाजी पाटील, बंडा पाटील रेठरेकर, संपत जाधव, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, राष्ट्रवादीचे शिराळा तालुका सरचिटणीस सुरेश चिंचोलकर, आनंद इंगळे, शिवाजी सुतार आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, उपस्थित होते.