नरेंद्र मोदींना निवडणुकांमध्येच स्वारस्य : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:55 PM2018-08-06T16:55:07+5:302018-08-06T17:06:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.
इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.
साखराळे (ता. वाळवा) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमीपूजन तसेच बौद्ध समाजमंदिर, प्राथमिक शाळा खोल्यांची दुरुस्ती व रस्त्याच्या कामाचा आ.पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आपली सत्ता असताना आम्ही त्यांची कामे केली आहेत. कारण विकास कामामध्ये राजकारण आणायचे नसते हा आमच्यावरचा राजकीय संस्कार आहे. साखराळेसह तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजनासाठी आम्ही पाठपुरावा केला असून ना. बबनराव लोणीकर यांच्या खास सूचनांवरून या योजना मंजूर झाल्या आहेत.
बाळासाहेब पाटील म्हणाले, आपण सर्वजण काही वर्षांपासून भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचा वाईट अनुभव घेत आहोत. आता या मंडळींना घरी घालवून आपल्या माणसांना सत्तेत आणण्यासाठी सामान्य माणसांच्या दारात जावूया. भविष्यातील सर्व निवडणुका आघाडीकडूनच लढवल्या जातील, अशा सूचना आम्हाला वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्या आहेत.