नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

By admin | Published: June 5, 2016 11:50 PM2016-06-05T23:50:11+5:302016-06-06T00:46:44+5:30

विनय सहस्रबुध्दे: ‘विकासपर्व’चे सांगलीत आयोजन

Narendra Modi's work is unimportant | नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

Next

सांगली : आपल्याच विचारधारेला कॉँग्रेसने दिलेली तिलांजली आणि सर्वच पातळीवर घोटाळ्यांची मालिका सुरू करणाऱ्या कॉँग्रेस सरकारपासून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे मिळाला. मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार ‘बेदाग’, निष्कलंक असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खा. विनय सहस्रबुध्दे यांनी रविवारी व्यक्त केला.
येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्यावतीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विकासपर्व’ या कार्यक्रमात सहस्रबुध्दे बोलत होते.
सहस्रबुध्दे म्हणाले की, देशात एका प्रबळ शासकाचा दुष्काळ अनेक दशके पडला होता. राजकीय पक्षांकडे असलेली विचारधारा विकासाचे प्रतिमान गाठण्यात अपयशी ठरत असताना, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा आणि संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न जनसंघापासून भाजपपर्यंत केला. याउलट सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसने विचारधारेचे नातेच संपवून टाकले. एकीकडे समाजवादाबद्दल निष्ठा व्यक्त करायची आणि दुसरीकडे भांडवलदारांचे स्वागत करायचे, या सर्वांतूनच कॉँग्रेसने विचारधारेला तिलांजली दिली होती.
जनतेची सुशासनाची तहान मोदी सरकारने भागविली तर आहेच, शिवाय जनताभिमुख कामकाजावर भर दिला आहे. निष्कलंक व्यवहार, गरीब, वंचित, शोषित वर्गाला न्याय, लोकहित, अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य, अशी काही वैशिष्ट्ये मोदी सरकारची सांगता येतील. सुगम्य भारत, पीक विमा योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप्, स्टॅण्डअप् योजना आदी अनेक योजनांतून जनतेला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, संभाजीराव भिडे, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत पटवर्धन, धनंजय खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘फाईव्ह इन वन’ संस्कृती
आजच्या तरूणांना सरकारकडून काय पाहिजे, याचा ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बीएचके फ्लॅट, दोन मुले आणि एक बायको असे सांगितले. आजच्या तरूणांना या संस्कृतीचा ध्यास लागल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले

Web Title: Narendra Modi's work is unimportant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.