नरवाडमध्ये वादळ, शॉर्टसर्किटमुळे कृषिपंप जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:29+5:302021-03-26T04:26:29+5:30

२३ मार्च रोजी आलेल्या अवकाळी पावसातील वाऱ्याने ईश्वरा कुंभार यांच्या शेतातील कूपनलिकेतील पाच अश्वशक्तीची विद्युत मोटार केबल ...

In Narwad, an agricultural pump caught fire due to a short circuit | नरवाडमध्ये वादळ, शॉर्टसर्किटमुळे कृषिपंप जळाला

नरवाडमध्ये वादळ, शॉर्टसर्किटमुळे कृषिपंप जळाला

Next

२३ मार्च रोजी आलेल्या अवकाळी पावसातील वाऱ्याने ईश्वरा कुंभार यांच्या शेतातील कूपनलिकेतील पाच अश्वशक्तीची विद्युत मोटार केबल व पाईपसह जळून खाक झाली. संबंधित कूपनलिकेपासून अवघ्या दहा फुटांवर कट्टीकरांच्या शेतात ट्रान्स्फॉर्मर आहे. याचठिकाणी तारांचे शाॅर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या कूपनलिकेवर पडून विद्युत साहित्य जळाले.

याच ठिकाणी यापूर्वीही अशाच घटना वारंवार घडूनही विद्युत वितरण कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही. हा ट्रान्स्फॉर्मर उभा करण्यास शेतकऱ्याचा विरोध असतानाही कूपनलिकेजवळ तो उभा केला आहे. परिणामी कुंभार यांना लाखो रुपयांच्या नुकसानीस तोंड द्यावे लागत आहे. याची विद्युत वितरण कंपनीने गांभीर्याने दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा ‌ईश्वरा कुंभार यांनी दिला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी एस. के. कुणके यांनी केला आहे.

Web Title: In Narwad, an agricultural pump caught fire due to a short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.