नाशिकच्या ठकबाजास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:31+5:302021-03-27T04:28:31+5:30

इस्लामपूर : शहरातील तहसील कार्यालय परिसरातील उद्योजकास झेरॉक्स पेपर पुरविण्याचे आमिष दाखवत त्यांची पाच लाख १९ हजार रुपयांची फसवणूक ...

Nashik's Thakbajas police cell | नाशिकच्या ठकबाजास पोलीस कोठडी

नाशिकच्या ठकबाजास पोलीस कोठडी

Next

इस्लामपूर : शहरातील तहसील कार्यालय परिसरातील उद्योजकास झेरॉक्स पेपर पुरविण्याचे आमिष दाखवत त्यांची पाच लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या घोटी (जि. नाशिक) येथील ठकबाज व्यापाऱ्यास पोलिसांनी अटक केली. त्याला येथील न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

राज दिनेश पंडित (वय ३१, घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे या ठकसेनाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अधिक आकाराम देशमुख (बहे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पंडित याने फेब्रुवारी ते जून २०२० या कालावधीत देशमुख यांना झेरॉक्स पेपर पुरविण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख १९ हजार २०० रुपये उकळले. त्यानंतर त्याने माल पाठवून देतो, असे खोटे सांगत देशमुख यांची फसवणूक केली.

देशमुख यांनी महिनाभरापूर्वी फिर्याद दिली होती. तेव्हापासून पंडित हा पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी इस्लामपूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Nashik's Thakbajas police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.