इस्लामपूर शहरात ‘नशिला झिंग’ पॅटर्न जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:23 PM2019-06-02T23:23:08+5:302019-06-02T23:23:13+5:30
अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर आणि शहर परिसरात पोलिसांच्या दहशतीचा आलेख ढासळत चालला आहे. युवकांना ...
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर आणि शहर परिसरात पोलिसांच्या दहशतीचा आलेख ढासळत चालला आहे. युवकांना नोकरी नाही, म्हणून त्यांचे लग्न होत नाही. त्यामुळे हे युवक नशिल्या झिंग पॅटर्नच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. चौका-चौकात असलेल्या पानपट्टीवर नशिले पावडर पान खाऊन तसेच नशिल्या गोळ्यांचे सेवन करुन पुन्हा फुकटचंबू फाळकूटदादा आपला रुबाब दाखवताना दिसत आहेत. त्याला आता महाविद्यालयीन युवकांचीही साथ मिळू लागली आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी बहे नाका येथे जोरदार हाणामारीचाही प्रकार घडला.
‘लोकमत’च्या दणक्याने शहरातील पान टपऱ्यांमधून विक्री होत असलेले नशिले पावडर पान काही दिवसांपुरतेच विक्री करणे बंद झाले. यामध्ये पोलिसांनीही आपला हात धुऊन घेतला. आता महिन्याचा अर्थपुरवठा पोलीस व अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना सुरु असल्याने खुलेआमपणे या पावडर पानाची विक्री पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. अशा पानपट्ट्यांपुढेच हे फाळकूटदादा मोठ्या प्रमाणात वावरतात. असे पान खाल्ले की मोठ्या प्रमाणात गुंगी येते. त्यामुळे आपण काय करतो हेही समजत नाही. यातूनच मग फुकट खाद्यपदार्थांची मागणी दुकानांमध्ये जाऊन केली जाते. तसेच काही ठिकाणी खंडणी मागण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. त्यातच आता नशा येणाºया गोळ्या सेवन करण्याचा फंडाही या फाटकूट दादांनी अवलंबला आहे.
या नशेत धुंद झालेल्या फाळकूट दादांना एखाद्या दुकानदाराने वस्तू देण्यास नकार दिल्यास, त्याच्या दुकानाची मोडतोड करणे, मारहाण करणे असेही प्रकार दिवसाढवळ्या घडू लागले आहेत. याकडे पोलिसांचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या नशेत वावरणाºया फाळकूट दादांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
शहरात आता कॅफे संस्कृतीही वाढू लागली आहे. येथे प्रवेश देताना कपललाच देण्याचा रिवाज आहे. १0 रुपयांची कॉफी येथे १00 ते १५0 रुपयांना विकली जाते. या कपलला बसण्याची आणि अश्लील चाळे करण्यासाठी येथे नाहरकत दाखलाच देण्यात आला आहे. याला महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या प्रमाणात बळी पडू लागल्या आहेत. अशा कॅफेंवरही पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
पण पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही. या प्रकाराचा त्रास सर्वसामान्य इस्लामपूरकरांना होऊ लागला आहे. पोलिसांनी मोठी घटना घडण्यापूर्वीच याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
विश्वास साळोखे
यांची आठवण..!
पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या सिंघम स्टाईलचा वापर सुरु केला. प्रथम त्यांनी शहरातील फाळकूट दादांवर आपल्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर वाहतुकीला शिस्त लावताना, दुचाकी चालविणाºया अल्पवयीन मुलांवरही कारवाई केली. तसेच पानटपºयांमधून सुरु असलेल्या नशिल्या पावडर पानावरही मोठी कारवाई केली. परंतु काही कारणास्तव या अधिकाºयाची बदली झाली आणि शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा पहिलेच दिवस अनुभवावे लागत आहेत.