राज्य नाट्यस्पर्धेत सांगली, सातारा केंद्रात वैयक्तिक चार पारितोषिकांसह 'शमा' प्रथम
By संतोष भिसे | Published: December 15, 2022 04:58 PM2022-12-15T16:58:31+5:302022-12-15T18:08:35+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरुवारी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. दोन्ही नाटके मुंबईतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
सांगली : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सांगली-सातारा केंद्रातून सांगलीतील नटराज फाऊंडेशनच्या 'शमा' नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. नायगाव (जि. सातारा) येथील सूर्यरत्न युथ फाऊंडेशनच्या 'आपुलीचा वाद आपणासी' नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरुवारी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. दोन्ही नाटके मुंबईतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
१५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत सांगलीत भावे नाटयमंदिर व साताऱ्यात शाहू कलामंदिरात स्पर्धा झाली होती. एकूण २३ नाट्यप्रयोग सादर झाले होते. निकाल असा : तृतीय - 'वटवट सावित्री', पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा.
दिग्दर्शन प्रथम विनोद आवळे (शमा), द्वितीय सिध्देश नेवसे (आपुलाची वाद आपणासी), प्रकाश योजना प्रथम यश नवले (अंत्यकथा), द्वितीय शाम चव्हाण (एकच प्याला), नेपथ्य प्रथम सिध्देश नेवसे (आपुलाची वाद आपणासी), द्वितीय प्रताप सोनाळे (अंत्यकथा), रंगभूषा प्रथम प्रसाद गद्रे (अंत्यकथा), द्वितीय किशोरी साळुंखे (शमा).
परीक्षक म्हणून सुहास वाळुंजकर, विश्वास देशपांडे आणि चंद्रशेखर भागवत यांनी काम पाहिले.
अभिनयासाठी रौप्यपदके
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अथर्व तारकुंडे (आपुलाची वाद आपणासी) व वैष्णवी जाधव (अंत्यकथा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शुभांगी चव्हाण (शमा), प्राजक्ता दयाळ (वटवट सावित्री), रत्नेषा पोतदार (शमा), वैष्णवी जाधव (गजर), भाग्यश्री कुलकर्णी (एकच प्याला), विजय काटकर (बदला गं माझा दादला), उदय गोडबोले (बाकी शून्य), आदित्य जोशी (खिडक्या), परेश पेठे (एकच प्याला) राजेश मोरे (वटवट सावित्री).