विठ्ठलवाडीनजीक राष्ट्रीय महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:27+5:302020-12-28T04:14:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६६ विठ्ठलवाडी (ता. कवठेमहंकाळ) गावानजीक मृत्यूचा सापळा ठरत आहे. वारंवार ...

The national highway near Vitthalwadi is a death trap | विठ्ठलवाडीनजीक राष्ट्रीय महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा

विठ्ठलवाडीनजीक राष्ट्रीय महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

घाटनांद्रे : रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६६ विठ्ठलवाडी (ता. कवठेमहंकाळ) गावानजीक मृत्यूचा सापळा ठरत आहे. वारंवार या परिसरात अपघात घडत आहेत. दाेन दिवसांपूर्वी टेम्पाेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू झाला, तर दाेघे जखमी झाले. या परिसरात भुयारी मार्ग करण्याची मागणी परिसरातून हाेत आहे. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या मागणीला थेट केराची टोपली दाखविली जात आहे.

रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६६ चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. विठ्ठलवाडीनजीक वळणावर वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत आसतात. त्यामुळे येथे नेहमी अपघात घडत आहेत. नुकताच दुचाकी व आयशर टेम्पोच्या धडकेत बापलेकांचा मृत्यू झाला, तर इतर दोघेजण जायबंद झाले. रस्ता धाेकादायक बनल्याने ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

एक तर रस्त्याच्या एका बाजूला संपूर्ण गाव, तर दुसऱ्या बाजूला या गावातील जवळपास ऐंशी टक्के लोकांच्या शेतजमिनी व वस्त्या आहेत. त्यामुळे आबालवृद्धांसह गावकऱ्यांना दरराेज जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडावा लागत आहे. परिणामी लहानमोठे आपघात नित्याचे ठरत आहेत. गावकरांच्या साेयीसाठी येथे भुुयारी मार्ग करावा, अशी मागणी हाेत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीला अधिकाऱ्यांकडून केराची टाेपली दाखविली जात आहे. कोरोनाचे कारण पुढे करून या राष्ट्रीय महामार्गचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे निश्चित भुयारी मार्ग केला जाईल. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

काेट

विठ्ठलवाडी येथे भुयारी मार्ग व्हावा यासाठी बरेच प्रयत्न केले. तो का गरजेचा आहे हेही प्रशासनाला पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे; पण अधिकाऱ्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही. लवकरच ग्रामस्थांच्यावतीने जनहित याचिका दाखल करणार आहे.

- किसनराव टोणे व रामचंद्र बजबळकर, विठ्ठलवाडी.

काेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या कामास आधीच विलंब झाला आहे. सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे निश्चित भुयारी मार्ग केला जाईल.

- पी. डी. कदम

संचालक राष्ट्रीय महामार्ग सोलापूर

फोटो : २७ घाटनांद्रे ०१

ओळी : विठ्ठलवाडी (ता. कवठेमहंकाळ) परिसरात भुयारी मार्गाअभावी रस्ता धाेकादायक ठरत आहे.

Web Title: The national highway near Vitthalwadi is a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.