आरआयटीतील माजी विद्यार्थ्याला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:29+5:302020-12-22T04:25:29+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिप्लोमा विभागातील माजी विद्यार्थी अमित प्रवीण भोसले याला मेजर ध्यानचंद केंद्रीय ...
इस्लामपूर : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिप्लोमा विभागातील माजी विद्यार्थी अमित प्रवीण भोसले याला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेतर्फे स्केटिंग या खेळात दिलेल्या योगदानाबद्दल आणि अतुलनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘सुवर्ण लक्ष’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले.
अमित प्रवीण भोसले हा या महाविद्यालयातील डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झाला आहे. डिप्लोमामध्ये शिकत असताना अमित भोसले याने स्केटिंगमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. त्याचा पुरस्कार ही त्यास प्राप्त झाला होता. राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनाही विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यामुळेच अशी कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळाले, असे मनोगत अमित भोसले याने व्यक्त केले.
यावेळी अमित भोसले याचे संस्थेचे सचिव प्रा. आर. डी. सावंत, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डीन डिप्लोमा डॉ. हणमंत जाधव, मेकॅनिकल विभागप्रमुख विनय चौधरी, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफिसर अमेय गौरवाडकर, स्वप्नील पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो - २११२२०२०-आयएसएलएम-पुरस्कार न्यूज