साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:25+5:302021-02-26T04:38:25+5:30

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूरचे उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी बीजभाषणात खगोलशास्त्र, ज्याेतिषशास्त्र व त्यामधील विसंगती, गैरसमज आणि अनिष्ठ ...

National webinar at Salunkhe College in excitement | साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

Next

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूरचे उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी बीजभाषणात खगोलशास्त्र, ज्याेतिषशास्त्र व त्यामधील विसंगती, गैरसमज आणि अनिष्ठ रूढी - परंपरा याविषयी वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी खगोलशास्त्राविषयी होणाऱ्या घडामोडी व संशोधन यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून प्रत्येकाने अद्ययावत राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

भौतिकशास्त्र विभागप्रमुख व संयोजक डॉ. जे. एल. भोसले यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. अमृता सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारचा लाभ १७३ विद्यार्थी- विद्यार्थिनी, संशाेधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला. प्रा. व्ही. डी. सूर्यवंशी, डॉ. हेरंब गायकवाड, अनुरथ गोरे, निशाद कुंभारे, अमृता सूर्यवंशी, श्रद्धा काटकर, अमित शिंगाना, सुरेखा मस्कर, जबीन मुल्ला, अनिरुद्ध देशमुख व विजय रावराणे यांनी वेबिनारचे आयोजन केले.

Web Title: National webinar at Salunkhe College in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.