भाजपच्या पहिल्या फळीची राष्ट्रवादीस मदत

By admin | Published: February 9, 2017 11:48 PM2017-02-09T23:48:07+5:302017-02-09T23:48:07+5:30

जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट; ढवळी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटल

Nationalist Congress Party's help | भाजपच्या पहिल्या फळीची राष्ट्रवादीस मदत

भाजपच्या पहिल्या फळीची राष्ट्रवादीस मदत

Next


तासगाव :राष्ट्र ाादीतून भाजपमध्ये गेलेल्या पहिल्या फळीतील नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीला छुप्या पद्धतीने मदत करणार आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी ढवळी (ता. तासगाव) येथील सभेत केला.
राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रचाराचा प्रारंभ ढवळी येथील सभेने करण्यात आला. यावेळी आ. सुमन पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा स्मिता पाटील, आदी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, आयाराम-गयारामांना जनता जागा दाखविल. निष्ठा नसलेले कार्यकर्ते हे अन्य पक्षात जात आहेत. उलट ते गेले हे चांगलेच झाले. कारण आता खऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल. नेत्यांच्या मागे-पुढे फिरणारे आणि फायदा करून घेण्यासाठी जवळ असणारेच लोक वारंवार पक्ष बदलत असतात. रंग बदलणारे सरडे ते सरडेच. अशा लोकांच्या जाण्याने काही फरक पडत नाही. त्यांचे घोंगडे कुठेतरी अडकलेले होते. कॉन्ट्रॅक्टर असणारेच लोक पक्ष बदलत आहेत. राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, सत्ता गेली म्हणून पक्ष बदलणे, हे योग्य नसते. जनता अशा लोकांना जाणून आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पहिल्या फळीतील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांची कामे भाजपमध्ये होत नाहीत. भाजपचे नेते त्यांचा फोनही उचलत नाहीत, असे खा. संजयकाका यांचे नाव न घेता ते म्हणाले. अपेक्षाभंगाचे दु:ख त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केले. या निवडणुकीत जाहीरपणे नसले, तरी छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी थोडा राजकीय अभ्यास करून तरी (पान १० वर)

Web Title: Nationalist Congress Party's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.