गॅस दरवाढ, महागाईविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:10+5:302021-07-03T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली. पेट्रोल, डिझेलचे दर तर रोजच वाढत आहेत. महागाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली. पेट्रोल, डिझेलचे दर तर रोजच वाढत आहेत. महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप करीत शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बजाज म्हणाले की, कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशावेळी केंद्रातील मोदी सरकारने मात्र पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. गॅसच्या दरातही २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या घराचे बजेटच कोलमडले आहे.
महापौर सूर्यवंशी म्हणाले की, एकेकाळी इंधन दरवाढीविरोधात आकाशपाताळ एक करणारी भाजप केंद्रात सत्तेत आहे. त्यांच्या काळात इंधनाचे दर दुप्पट, तिप्पट झाले.
या आंदोलनात नगरसेवक विष्णू माने, अतहर नायकवडी, सागर घोडके, माजी नगरसेवक शेखर माने, हरिदास पाटील, ज्योती आदाटे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, संदीप व्हनमाने, शुभम जाधव, आयुब बारगीर, अकबर शेख सहभागी झाले होते.