नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचा दौंडमध्ये पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:00+5:302021-03-09T04:29:00+5:30
दौंड येथील जाधव ट्रस्टतर्फे देण्यात आलेला पुरस्कार सांगलीतील नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या डॉ. हर्षद दिवेकर यांनी स्वीकारला. लोकमत न्यूज नेटवर्क ...
दौंड येथील जाधव ट्रस्टतर्फे देण्यात आलेला पुरस्कार सांगलीतील नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या डॉ. हर्षद दिवेकर यांनी स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीला निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सन्मानित करण्यात आले. दौंड (जि. पुणे) येथील स्व. सौ. रोहिणी रवींद्र जाधव स्मारक ट्रस्टतर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या दिवंगत पत्नी सौ. रोहिणी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला निवडले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी नेचर कॉन्झर्व्हेश सोसायटीची निवड करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हर्षद दिवेकर यांनी सन्मान स्वीकारला. सोसायटीने प्राणी, जंगले, प्रदूषण, जलसंवर्धन आदी क्षेत्रांत खूपच मोठे काम केेले आहे. गेल्या काही वर्षांपासून अवर्षणग्रस्त भागात मियावाकी वनराई फुलविण्यात यश मिळविले आहे. या प्रयत्नांची दखल ट्रस्टने घेतली.