नवरत्न पतसंस्था १२ टक्के लाभांश देणार : सचिन चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:14+5:302021-09-23T04:29:14+5:30
ओळ : आष्टा येथील नवरत्न पतसंस्थेच्या वार्षिक सभेत संस्थापक सचिन चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय डांगे, प्रमोद कोरेगावे, ...
ओळ : आष्टा येथील नवरत्न पतसंस्थेच्या वार्षिक सभेत संस्थापक सचिन चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय डांगे, प्रमोद कोरेगावे, संगीता कोरेगावे व पदाधिकारी उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा येथील नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने उत्साहात झाली. सभेत संस्थेचे संस्थापक सचिन चौगुले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर केला
अध्यक्ष संजय डांगे म्हणाले की, संस्थेने आष्टा व परिसरातील होतकरू सर्वसामान्य उद्योजकांना आर्थिक आधार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
सचिव प्रमोद कोरेगावे म्हणाले की, संस्थेच्या ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपाध्यक्षा संगीता कोरेगावे म्हणाल्या की, संस्थेने महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. याचा महिलांनी लाभ घ्यावा.
यावेळी शशिकांत रावळ, सुनील पाचोरे, सुधीर हालुंडे, प्रकाश मोरे, शुभांगी चौगुले, सचिन कुकडे, संजय लिगाडे, संतोष थोटे, विजय कांबळे, संदीप आवटी, रोहित चौगुले, बाळासाहेब हेर्ले, जीवनधर हालुंडे तसेच सर्व सल्लागार सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. बाबासाहेब चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.