नेर्लेतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सहकार पॅनलला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:02+5:302021-05-30T04:22:02+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व उपसरपंच विश्वास पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्यकारिणी ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व उपसरपंच विश्वास पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्यकारिणी सदस्य शुभम पाटील व ग्रामपंचायत सदस्य निवास माने यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा दिला. यानिमित्त त्यांचा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व युवा नेते डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपसरपंच पाटील हे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते यांचे, तर शुभम पाटील हे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसले गटात प्रवेश केला आहे. यावेळी माजी सरपंच संभाजी पाटील, डी. आर. पाटील, दत्तात्रय पाटील, दिनकर मोकाशी, चेतन रणखांबे, सदाशिव सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी उपस्थित होते.
फोटो : २७०५२०२१-आयएसएलएम- नेर्ले राष्ट्रवादी : नेर्ले येथील पदाधिकाऱ्यांनी भोसले गटात प्रवेश केल्यानंतर उपसरपंच विश्वास पाटील, शुभम पाटील, निवास माने यांचा सत्कार सुरेश भोसले व अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.