दुष्काळी फोरमसह राष्ट्रवादीची साथ
By Admin | Published: May 17, 2014 12:15 AM2014-05-17T00:15:47+5:302014-05-17T00:16:04+5:30
सांगली : संजय पाटील यांनी विजयाचे श्रेय ज्या नेत्यांना दिले, त्यात दुष्काळी फोरमसह राष्टÑवादीच्या पदाधिकार्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पडद्यामागे घडलेल्या
सांगली : संजय पाटील यांनी विजयाचे श्रेय ज्या नेत्यांना दिले, त्यात दुष्काळी फोरमसह राष्टÑवादीच्या पदाधिकार्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आता चर्चेला येत आहेत. जतचे विलासराव जगताप यांनी उघडपणे संजयकाकांचा प्रचार केला होता. त्यामुळे राष्टÑवादीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्याचबरोबर माजी मंत्री व राष्टÑवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनीही संजयकाकांमागे ताकद उभी केली. आघाडी धर्मापेक्षा मित्रप्रेम महत्त्वाचे मानून या नेत्यांनी संजयकाकांना मदत केली. शेवटच्या टप्प्यात राष्टÑवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनीही हातभार लावला. निकालानंतर मतमोजणी केंद्रावर संजयकाकांसोबत जगताप व दिनकर पाटील यांनीही गुलालाचा आनंद लुटला. आघाडी धर्माचा गाजावाजा झाला असला तरी, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राष्टÑवादीने संजयकाकांनाच मदत केल्याचे दिसून येत आहे. राष्टÑवादीने विशेषत: ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मागील दोन्ही वेळेला प्रतीक पाटील यांना नमविण्याचे प्रयत्न फोल ठरले होते. दिनकर पाटील आणि घोरपडेंना दिलेले बळ वाया गेले होते. यंदा मात्र दुष्काळी फोरमचे नेते आणि राष्टÑवादीची ताकद संजय पाटील यांच्या विजयात कामी आली. (प्रतिनिधी)