राष्ट्रवादीने महिलांचे सक्षमीकरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:18+5:302021-03-27T04:27:18+5:30

पलूस : राष्ट्रवादी पक्षाने महिलांच्या सन्मानासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी आपली भूमिका ठामपणे मांडणारा एकमेव ...

The NCP empowered women | राष्ट्रवादीने महिलांचे सक्षमीकरण केले

राष्ट्रवादीने महिलांचे सक्षमीकरण केले

Next

पलूस : राष्ट्रवादी पक्षाने महिलांच्या सन्मानासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी आपली भूमिका ठामपणे मांडणारा एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी व्यक्त केले.

पलूस येथे महिलांना निम्म्या किमतीत आटा चक्कीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यात महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यापूर्वी महिलांच्या सुरक्षेसाठी तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून जिल्ह्याला पथदर्शक प्रकल्प आम्ही घालून दिला. तसेच महिला सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

दिनांक २६ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत पलूस बसस्थानकाजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या चक्कीची नोंदणी सुरू राहणार आहे. याचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

यावेळी नंदाताई पाटील, वैशाली मोहिते, पूजा लाड, मंगल शितापे, अरुणा जाधव, मृणाल पाटील, पूनम जाधव, प्राजक्ता जाधव, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मारुती चव्हाण, ज्ञानेश पाटील, सुरेश शिंगटे, विनायक महाडिक आदी उपस्थित होते.

Web Title: The NCP empowered women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.