कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:35 AM2022-11-10T11:35:28+5:302022-11-10T11:36:06+5:30

नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना

NCP is making adjustments to avoid a repeat of Tasgaon Kavthe Mahankal. | कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

googlenewsNext

-दत्ता पाटील

तासगाव- कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा 'करेक्ट कार्यक्रम' केला. खासदार संजयकाका पाटील सगळ्या घडामोडींच्या श्रेयाचे धनी असले, तरी खरी चर्चा ही पडद्यामागच्या 'करेक्ट कार्यक्रमा'चीच झाली. याच धास्तीने राष्ट्रवादीचे नेतृत्व 'अलर्ट' झाले आहे. तासगाव कवठेमहांकाळची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जुळवाजुळव सुरू आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी सर्व नेत्यांच्या विरोधात जाऊन पॅनल उभे केले आणि एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर रोहित पाटील यांनी बांधलेली मोट विस्कळीत झाली. नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सलगी असणाऱ्या अशोक जाधव समर्थक दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष निवडीत पराभव पत्करावा लागला. लवकरच तासगाव नगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. यातही खासदार विरुद्ध आमदार गट एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. कवठेमहांकाळच्या 'करेक्ट कार्यक्रमा'ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेतृत्व 'अलर्ट' झाले.

जयंत पाटील गट तासगावात दखलपात्र

पॅनल उभे केले आणि एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर रोहित पाटील यांनी बांधलेली मोट विस्कळीत झाली. नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सलगी असणाऱ्या अशोक जाधव समर्थक दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष निवडीत पराभव पत्करावा लागला. लवकरच तासगाव नगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. यातही खासदार विरुद्ध आमदार गट एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.

Web Title: NCP is making adjustments to avoid a repeat of Tasgaon Kavthe Mahankal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.