राष्ट्रवादीवर नाराजी कायम

By admin | Published: July 19, 2014 11:10 PM2014-07-19T23:10:39+5:302014-07-19T23:23:52+5:30

पृथ्वीराज देशमुख : जगतापांनीही दिला दुजोरा

NCP remains angry | राष्ट्रवादीवर नाराजी कायम

राष्ट्रवादीवर नाराजी कायम

Next

सांगली : राष्ट्रवादीवर आमची नाराजी कायम आहे. पक्षाच्या अनेक निर्णयांमुळे स्थानिक पातळीवर आमची घुसमट होत आहे, असे सांगतानाच जिल्ह्यात बदलाचे वारे वहात असल्याचे मत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आज (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. विलासराव जगतापांनीही त्यांच्या या वक्तव्यास दुजोरा दिला. हे वारे पक्षबदलाचे की सत्ताबदलाचे आहे, याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टोक्ती दिली नाही.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज देशमुख व जगताप एकत्र आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षबदलाबाबतचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात अजून आघाडी किंवा महायुतीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यापूर्वीच आमच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय त्यावेळीच घेतला जाईल. बदलाचे वारे जिल्ह्यातही वाहत आहे. यावेळी जगतापांनीही या मताला दुजोरा दिला. दोन्हीही नेत्यांनी पक्षप्रवेशाबाबत बोलणे टाळले.
दुष्काळी फोरममधील जगताप, देशमुख यांच्यासह अजितराव घोरपडे, अनिल बाबर यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सध्या जोरात आहेत. या सर्व नेत्यांची नावे महायुतीशी जोडली जात आहेत. बाबर व देशमुख शिवसेनेत जात असल्याचे, तर जगताप व घोरपडे भाजपमध्ये जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर या जगताप व देशमुखांनी पक्षबदलाबाबत सध्या हालचाल नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP remains angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.