आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:40+5:302021-09-10T04:32:40+5:30

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. त्या स्वबळावर जिंकणारच ...

NCP will fight on its own in Atpadi taluka | आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

Next

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. त्या स्वबळावर जिंकणारच आहोत. त्यासाठीच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी केले.

आटपाडी येथेे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, आटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुपंत पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव एन. पी खरजे, ज्येष्ठ नेते विलास नांगरे-पाटील, शहाजी पाटील, विकास कदम, पंचायत समिती सदस्य उषाताई कुटे, प्रभाकर नांगरे, आटपाडी तालुका युवकचे अध्यक्ष सूरज पाटील, बोंबेवाडी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हणमंत करांडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

यावेळी राष्ट्रवादीची ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत पाेहाेचवून तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्याचे ठरले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर ताकदीने लढवून चारही जिल्हा परिषद गट व आटपाडी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, आटपाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात मेळावे घेणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेत प्रचाराचा आरंभ करण्यात येणार आहे.

यावेळी प्रा. एन. पी. खरजे म्हणाले, धनगर समाजाचा कुणी ठेका घेऊ नये. राष्ट्रवादी जात धर्म याच्यापलीकडे जाऊन मानवतावादाची उपासना करणारा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने जाणारा पक्ष आहे.

यावेळी सरपंच अलका करांडे, आबासाहेब नांगरे, दिनकर करांडे, परशुराम सरक, किशोर गायकवाड, राजेंद्र सावंत, रणजित पाटील, नंदकुमार नांगरे, जालिंदर कटरे, संभाजी पाटील, संताजी देशमुख, भाऊसाहेब देशमुख, काकासाहेब जाधव, गोविंदराव कदम, संभाजी कदम, दत्ता यमगर, नितीन डांगे, समाधान मोटे, हणमंत चव्हाण, गणेश कबीर, गणेश ऐवळे, सागर डोईफोडे, गणेश नांगरे, किरण हाके, सुनील लेंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP will fight on its own in Atpadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.