आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:15 PM2024-09-06T17:15:10+5:302024-09-06T17:17:20+5:30

Jayant Patil Vishal Patil : काल सांगली येथील एका कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

NCP's Jayant Patil and MP Vishal Patil were seen on the same platform and discussed in the political circles | आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र

आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र

Jayant Patil Vishal Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका होऊन काही महिने उलटले, या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. विजयानंतर खासदार विशाल पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. यामुळे येणाऱ्या काळात दोन्हा पाटलांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष होऊ शकतो अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, काल कडेगावातील एका फोटोमुळे याच्या उलट चर्चा सुरू आहेत. काल कडेगावातील कार्यक्रमात जयंत पाटील आणि विशाल पाटील खुर्चीला खूर्ची लावून बसले होते. यावेळी दोघांच्या बराचवेळ चर्चाही झाली. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. 

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

काल सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार शरद पवार, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील जवळ-जवळ बसले होते. कार्यक्रमाची सुरूवात झाल्यापासूनच या दोन नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. दोन्ही नेते खळखळून हसत होते. यामुळे आता सांगली जिल्ह्यातील राजकारणात चर्चा सुरू आहेत. 

राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. याआधी काही दिवसापूर्वी खासदार विशाल पाटील यांनी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. तर दुसरीकडे हे दोन्ही नेते एकत्र बसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  दरम्यान, या दोन्ही नेते एकत्र चर्चा करत असल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कडेगाव येथील आहे. 

लोकसभेत तिकिट देण्याला विरोध केल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकात सांगली लोकसभेतून जयंत पाटील यांनी विरोध केल्याचा आरोप नाव न घेता विशाल पाटील यांनी केला होता. यामुळे जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात अंतर्गत विरोध असल्याची चर्चा सुरू होती.  हे दोन्ही नेते कधी एकत्रित कार्यक्रमात दिसले नव्हते, पण आता एकत्र आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील समीकरणे वेगळी असू शकतात अशा चर्चा सुरू आहेत. 

Web Title: NCP's Jayant Patil and MP Vishal Patil were seen on the same platform and discussed in the political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.