महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची जंबो कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:00+5:302021-01-08T05:25:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी सोमवारी रात्री जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी सोमवारी रात्री जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
विविध सेल व मुख्य कार्यकारिणीत २१ नवे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. यामध्ये शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी हारुण खतीब, चंद्रकांत हुलवान यांची, सरचिटणीसपदी अर्जुन कांबळे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी कुमार वायदंडे, शहराध्यक्षपदी गॅब्रियल तिवडे यांची, ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी संजय सरवदे, मिरज शहरच्या युवती विभागाच्या अध्यक्षपदी सुमय्या काझी आदींच्या निवडी करण्यात आल्या.
राष्ट्रवादीच्या वसंत कॉलनीतील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जयंत पाटील म्हणाले की, नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी कष्ट घ्यावेत. महापालिका क्षेत्रातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडावे. त्यांना आवश्यक ते सहकार्य पक्षामार्फत केले जाईल. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार आदी उपस्थित होते.