दुधगावात स्वाभिमानीविरोधात राष्ट्रवादीची स्थानिक आघाडी--सरपंचपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:04 PM2017-09-22T22:04:19+5:302017-09-22T22:04:53+5:30

दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे

NCP's local leadership - Sarpanchchad open against self-respect in Dudhag | दुधगावात स्वाभिमानीविरोधात राष्ट्रवादीची स्थानिक आघाडी--सरपंचपद खुले

दुधगावात स्वाभिमानीविरोधात राष्ट्रवादीची स्थानिक आघाडी--सरपंचपद खुले

googlenewsNext
ठळक मुद्दे निवडणूक होणार चुरशीची; मोर्चेबांधणी सुरूभाजपने सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली आहे.

अमोल कुदळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथील सरपंचपद खुले झाल्याने या पदासाठी दोन्ही गटाकडून मोठी चुरस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत स्थानिक विकास आघाडी होणार आहे.
दुधगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरलेली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवारांसह नेत्यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. युवा नेत्यांनीही नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

गतवेळी ग्रामपंचायतीची निवडणूक गावातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती. गावातील स्थानिक नेत्यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्रत्येक गटाला पंचायतीत स्थान मिळाले होते.यावेळी चित्र पूर्णपणे उलटे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली आहे. त्यामुळे जसे दिवस जातील, तशी निवडणुकीत रंगत येऊ लागली आहे.

गाव आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वपक्षीय आघाडी असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. तसेच भाजपच्यावतीने सरपंचपदासाठी उमेदवार उतरवला जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, भरत साजणे, बाबा सांद्रे, प्रकाश मगदूम यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रमोद आवटी, विलास आवटी, संभाजी गावडे, विकास कदम यांच्यासह इतर पक्षातील काँग्रेसचे महावीर पाटील व अन्य इच्छुकांना एकत्रित करुन स्थानिक विकास आघाडी केली जाण्याची शक्यता आहे. भाजपने सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली आहे.

दरम्यान, सरपंच निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे यावेळी नेत्यांच्या इशाºयावर काम करणारा नव्हे, तर गावकºयांना विश्वासात घेऊन विकास साधणारा सरपंच आपणच निवडणार असल्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहºयावर दिसत आहे. यामुळे इच्छुकांनी आतापासूनच मतदारांना आपली बाजू पटवून देण्यास सुरुवात केली आहे. आपणच गावचा विकास कसा करु शकतो, हेही ते पटवून देत आहेत. युवकवर्गावर त्यांचे लक्ष आहे.

सरपंचपदाचे : इच्छुक
सरपंचपदासाठी सर्वपक्षीय आघाडीकडून अविनाश कुदळे, महावीर पाटील (सांद्रे), उमेश आवटी, विकास कदम, तर स्वाभिमानीकडून सुभाष पाटील (समगोंड), गिरीश पाटील, सुनील पाटील (ऐन्नाक) यांची नावे आघाडीवर आहेत; तर भाजप अथवा अपक्ष बबन जाधव.

Web Title: NCP's local leadership - Sarpanchchad open against self-respect in Dudhag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.