विकासानेच शिराळ्यात राष्ट्रवादीची सत्ता
By admin | Published: June 15, 2017 10:59 PM2017-06-15T22:59:56+5:302017-06-15T22:59:56+5:30
विकासानेच शिराळ्यात राष्ट्रवादीची सत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही केल्यामुळेच मतदार नगरपंचायत निवडणुकीत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच आमची सत्ता शिराळा नगरपंचायतीवर आली, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के, तर उपनगराध्यक्षपदी कीर्तीकुमार पाटील यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अॅड. भगतसिंग नाईक, वीराज नाईक, प्रमोद नाईक, बसवेश्वर शेटे, गौतम पोटे, चंद्रकांत निकम, देवेंद्र पाटील, विश्वास कदम, सम्राटसिंह नाईक उपस्थित होते.
मानसिंगराव नाईक म्हणाले, आम्ही शिराळा नगरपंचायत निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली. शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे केली, तसेच सुधारित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अंबामाता मंदिर परिसराचे सुशोभिकरण, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला सुरुवात, भव्य प्रशासकीय इमारत, अद्ययावत पंचायत समिती इमारत तसेच शिराळा बसस्थानक इमारत यासह गावातील कॉँक्रिटीकरण पूर्ण केले. अशी कोट्यवधीची विकास कामे केली. त्यामुळे मतदार आमच्या पाठीशी राहिले. विरोधकांनी स्वत:ची संस्था मोडकळीस आणली. त्यांनी आमदार झाल्यावर मतदार संघात काय विकास केला, हे दिसत आहे. नाईक म्हणाले, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सदस्य यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत. त्यांची कामे करावी. लोकांची सेवा करण्यासाठी आपण आलो आहोत, हे लक्षात ठेवावे.
यावेळी संजय हिरवडेकर, संभाजी गायकवाड, विजय दळवी, लालासाहेब पवार, प्रमोद पवार, लालासाहेब तांबीट, गजानन सोनटक्के, प्रताप मुळीक आदी उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी स्वागत केले.