कणेगाव, भरतवाडीत एनडीआरएफची पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:22+5:302021-07-24T04:17:22+5:30
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात वारणा नदीच्या पुराचे पाणी कणेगाव, भरतवाडी गावात शिरले आहे. त्यामुळे नागरिक स्थलांतरीत हाेत ...
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात वारणा नदीच्या पुराचे पाणी कणेगाव, भरतवाडी गावात शिरले आहे. त्यामुळे नागरिक स्थलांतरीत हाेत आहेत. कुंडलवाडीचा राष्ट्रीय महामार्गाशी असणारा संपर्क तुटला आहे. पूरस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकास पाचारण केले आहे.
तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी गावास भेट देऊन स्थलांतराबाबत सूचना केल्या. यामुळे मध्यरात्री नदीचे पाणी गावात शिरताच नागरिकांनी ताबडतोब स्थलांतरित होण्यास सुरुवात केली. भरतवाडी येथील दहा कुटुंबे बाहेर पडली नव्हती; मात्र सकाळी पुन्हा पाणी पातळी वाढत गेल्याने प्रशासनाने एनडीआरएफची पथके पाचारण करून या कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.
कुंडलवाडीला राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तांदूळवाडी रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला आहे. या गावांतून येलूरमार्गे राष्ट्रीय महामार्गाला जाणाऱ्या रस्त्यावर तीन फूट पाणी आहे. त्यामुळे कुंडलवाडीतही पूरस्थिती गंभीर बनली आहे.