चांदोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:41+5:302021-05-27T04:27:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चांदोली अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी ...

The need to develop Chandoli for tourism | चांदोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची गरज

चांदोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : चांदोली अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शिराळा तहसीलदार कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने जंगलातील टॉवरवर पर्यटकांना मुक्काम करण्याच्या दृष्टीने त्या टॉवरचे रुंदीकरण केले पाहिजे. सफारी ट्रॅक सुधारणा करा. कास पठारापेक्षा मोठा व विस्तीर्ण असणाऱ्या झोळंबी पठारावरील वनस्पती, रानफुलांचा मनमोहक सडा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या सर्वांचा जोरदार प्रचार करण्याची गरज आहे. वाघ व बिबट्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने जंगलात ससे, हरणे व रानडुक्कर यांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी त्यांना मुबलक हिरवे गवत व नैसर्गिक खाद्य उपलब्ध झाले पाहिजे.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपवनसंरक्षक विजय माने, युवानेते विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, बाळासाहेब पाटील, विजयराव नलवडे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आदी उपस्थित होते.

चौकट

इस्लामपूरला दत्त टेकडी परिसर विकसित करा

इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसर विकसित करण्याच्या दृष्टीने वनविभागाने नियोजन करावे. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करा, शासन त्यास तत्काळ मंजुरी देईल, अशा सूचनाही पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: The need to develop Chandoli for tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.