भारीतली औषधे पाहिजेत? खासगी मेडिकल उघडी आहेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:31+5:302021-01-16T04:30:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खासगीमध्ये परवडत नाही म्हणून शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तेथेही अैाषधांसाठी खिसा हलका करावा लागतोच. ...

Need heavy medications? Private medicals are open! | भारीतली औषधे पाहिजेत? खासगी मेडिकल उघडी आहेत !

भारीतली औषधे पाहिजेत? खासगी मेडिकल उघडी आहेत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : खासगीमध्ये परवडत नाही म्हणून शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तेथेही अैाषधांसाठी खिसा हलका करावा लागतोच. सांगलीत शासकीय रुग्णालयातील औषध उपलब्धता व चिठ्ठ्यांवर नजर टाकली असता ही वेदनादायी स्थिती समोर येते.

फक्त जेनेरिक अैाषधांवर भर असणारे शासकीय रुग्णालय रुग्णांना अपेक्षित वेळात आजारमुक्त करू शकत नाही. अशावेळी बाहेरील खासगी औषधे लिहून देण्याशिवाय डॉक्टरांनाही पर्याय राहत नाही. विशेषत: कॉम्बिनेशन प्रकारातील औषधे बाहेरूनच आणावी लागतात असा अनुभव आहे. रक्तदाब, मधुमेह, ताप, सर्दी, खोकला, लहान मुलांची सिरप अशी काही सर्वसामान्य आजारांवरील औषधे सिव्हीलमध्ये उपलब्ध आहेत. पण मधुमेहाच्या रुग्णाला हृदयविकार किंवा अन्य आणखी विकार असतील तर त्यासाठी कॉम्बिनेशन प्रकारातील औषधे बाहेरचीच द्यावी लागतात. सुदैवाची बाब म्हणजे क्षयरोग आणि एड्सवरील औषधे मात्र पुरेशी उपलब्ध आहेत.

-----

प्रसूतीसाठीही बाहेरील औषधे

सामान्य प्रसूती झाली तर सिव्हिलमधील औषधांवर भागते. गर्भाशयाला टाके पडले किंवा सिझेरियन झाले, तर मात्र बाहेरील साहित्य वापरावे लागते. अर्थात हा खर्च हजार-पंधराशेपर्यंत आटोपतो असा दावा डॉक्टरांनी केला.

-------

कलर डॉपलर सोनोग्राफीसाठी तपासणीसाठी चिठ्ठी मिळालेला रुग्णबाहेरील प्रयोगशाळेत हजारो रुपये खर्च करतो. त्यानंतरच त्याच्या आजाराचे निदान होते. अर्थात सिव्हिलमध्ये ही सोय नसल्याने पर्यायदेखील राहत नाही.

-----

अस्थिरोग विभागात शस्त्रक्रियेसाठीच्या प्लेट्स किंवा रॉड्स बाहेरूनच आणावे लागतात. सिव्हिलमध्ये त्या उपलब्ध नाहीत. अर्थात उर्वरित सर्व उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेत बसवून रुग्णाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

---

मधुमेह आणि रक्तदाबासह अन्य बहुविकाराच्या रुग्णांनानाही बाहेरूनच औषधे दिली जातात. कॉम्बिनेशन प्रकारातील औषधे सिव्हिलमध्ये नसल्याने रुग्णांच्या खिशाला चाट बसते.

---------

प्रयोगशाळांच्या एजंटांचे बस्तान

सिव्हिलमध्ये प्रयोगशाळा आणि रक्तपेढ्यांच्या एजंटांची नेहमी गर्दी असते. ८० टक्के तपासण्याअंतर्गत प्रयोगशाळेत होतात, उर्वरित २० टक्के तपासण्यांसाठी महागडी यंत्रसामग्री किंवा औषधे नसल्याने बाहेरील प्रयोगशाळेत जावे लागते. शस्त्रक्रिया किंवा अन्य कारणास्तव रक्त पुरवठ्यावेळीही एजंट रुग्णाच्या नातेवाइकांना बरोबर हेरतात.

-----

कोट

अत्यावश्यक प्रव्गातील अैाषधे सिव्हीलमध्ये उपलब्ध नसतील तरच बाहेरुन आणण्याची शिफारस केली जाते. रुग्ण गरीब असेल आणि त्याची तयारी नसेल तर रुग्णालयातील अैाषधांवरच आजार बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. शासकीय प्रक्रियेनुसार हाफकीन संस्थेकडून अैाषधे मिळतात. ती मिळण्या विलंब झाला तर स्थानिक पातळीवर निविदा प्रक्रियेतून तातडीची अैाषधे उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो. रुग्णांना अैाषधांसाठी चिठ्ठी द्यावी लागू नये याचा पुरेपूर प्रयत्न असतो.

- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक

------------

Web Title: Need heavy medications? Private medicals are open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.