कमी खर्चात जास्त उत्पादन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:18+5:302021-01-23T04:27:18+5:30
आष्टा : शेतीमध्ये प्रचंड खर्च करून जास्त उत्पादन मिळविणे हा शहाणपणा नाही; मात्र याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी ...
आष्टा : शेतीमध्ये प्रचंड खर्च करून जास्त उत्पादन मिळविणे हा शहाणपणा नाही; मात्र याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आपल्या शेतीचा पोत सुधारून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सार्थक ॲग्रोचे संस्थापक प्राध्यापक नितीन घसघसे यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथे ‘स्वस्त शेती मस्त शेती’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कमी खर्चात शंभर टन ऊस उत्पादनाबाबत त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, कोणत्याही रासायनिक कीटनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर न करता भाजीपाला, केळी, हळद, द्राक्षे, ऊस या पिकांचे जैविक पद्धतीने कीटक व बुरशीपासून संरक्षण करावे. जैविक पद्धतीने भाजीपाला करावा. या मालाला निर्यातीसाठी चांगला वाव आहे.
संयोजन तुषार शिंदे यांनी केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुंडल शहराध्यक्ष बाबूराव शिंदे, कुंडल विकास सोसायटीचे सचिव मधुकर कुंभार, अशोक जाधव, उदय जाधव, राहुल आटुगडे उपस्थित होते. ॲड. दीपक लाड यांनी आभार मानले.
फोटो : सार्थक ॲग्रोच्या जैविक औषधामुळे केळीचे भरघोस उत्पादन मिळत आहे.