‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

By Admin | Published: March 13, 2016 10:47 PM2016-03-13T22:47:55+5:302016-03-14T00:23:07+5:30

सुभाष देशमुख : जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा, शासनाला अहवाल देणार

Need of Rs 275 crores for 'Mhaysal' | ‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

googlenewsNext

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी २५० ते २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) यांनी दिली.
ते म्हणाले, शासन जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाईसाठी प्रत्येकवर्षी सर्वसाधारण पाच कोटी रुपये खर्च करत आहे. जो खर्च होईल तो एकदाच होणार आहे. त्यानंतर मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होणार नाही. येथील नागरिकांनाही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करावे लागणार नाही. म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी येथील जनतेची भावना आहे. शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी जत शहर व तालुक्यातील बनाळी, वायफळ, अचकनहळ्ळी गावांचा दौरा केला. त्यांच्यासमवेत आ. विलासराव जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, शेतसारा, वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत, वर्षातून तीनवेळा म्हैसाळ कालव्यातून आवर्तन करावे, वायफळ (ता.जत) पर्यंत कालव्यातून पाणी सोडावे, हवामानावर आधारित पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत आदी मागण्या शेतकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे केल्या आहेत.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, संजयकुमार सावंत, रमेश साबळे, विलास पाटील, सुरेश शिंदे, शिवाजीराव ताड, बी. आर. सावंत, हेमंत भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)


छावणी सुरु करण्याची मानसिकता नाही
चारा छावणी सुरू करण्याची शासनाची मानसिकता नाही. परंतु पशुधन जगविण्यासाठी शासन चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Need of Rs 275 crores for 'Mhaysal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.