पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:32+5:302021-07-08T04:18:32+5:30
सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे ...
सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष व त्यामुळे भविष्यात येणारे अनर्थ लक्षात घेता, तरुणाईने यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने ‘भूजल साक्षरता’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोसकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे होते.
गोसकी पुढे म्हणाले, सध्या मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने त्याकडे आपले दुर्लक्ष होते. पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब आपण ठेवत नाही, हीच खरी मोठी अडचण आहे. पाण्याच्या बाबतीत आपण आपण गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. भूजल सर्वेक्षण व साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, हे नक्कीच आशादायी चित्र आहे. यासाठीच पाण्याचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.