नेट बॅँकिंग फसवणूक; महिलेस अटक--आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी पलूसला जेरबंद
By admin | Published: October 1, 2014 11:16 PM2014-10-01T23:16:25+5:302014-10-02T00:10:42+5:30
शेतात अर्भक पुरले; प्रेमीयुगुलास अटक
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील शुक्रवार पेठेतील महिला व्यापारी सुश्मिता खाटक यांच्या बँक खात्यातून ११ लाख १५ हजार रुपये नेट बँकिंगद्वारे लंपास केल्याप्रकरणी रोशन आरा खान (वय ३२, रा. पश्चिम बंगाल) या महिलेस अटक करण्यात आली असून, तिला आज (बुधवार) न्यायालयासमोर हजर केले असता, सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, ती पोलिसांना तपास कामात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुश्मिता खाटक यांच्या नेट बँकिंगचा पासवर्ड मिळवून त्यांच्या खात्यावरून ११ लाख १५ हजार रुपये चोरट्यांनी परस्पर काढले होते; मात्र त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्याने त्यांना बँकेतून रक्कम काढल्याचा संदेश मोबाईलवर आला नाही. त्यामुळे त्यांनाही हा घडलेला प्रकार समजला नाही. मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकेतून रक्कम काढल्याचा संदेश त्यांना आला. खाटक यांच्या बँक खात्यावरून रक्कम कोणाच्या नावावर व कोणत्या बँकेत हस्तांतर झाली, याचा शोध पोलिसांनी घेतला. त्यावेळी रोशन खान या महिलेचे नाव निष्पन्न झाले होते. तिने मुंबईतील खारघर येथील एका एटीएममधून चार लाख रुपये काढले होते. रोशन खान हिला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून तिला विश्रामबाग पोलिसांनी आज ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी पलूसला जेरबंद
पलूस : झारखंड राज्यातील सातजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीस पलूस पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. महंमद फरजून महंमद सिकंदर शेख (वय २१), (रा. यदुलीतुल्ला, ता. राधानगर, जि. साहेबगंज) शेख महंमद इम्तियाज शेख (२६, रा. पियारपूर, ता. राधानगर), इम्रान बरकत अलीशेख, (१९, रा. पिहारपूर) आसरू सलीम शेख (४२), मेहबूब मजबूर रेहमान आलम (२७), बाहरून मजबूल शेख (२७), कामू मांजारुल शेख (२६, सर्व रा. किनवागडखी, ता. रांगा, जि. साहेबगंज, झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफ बाजार व रामानंदनगर भागामध्ये या दरोडेखोरांची टोळी सक्रिय होती. (वार्ताहर)
सुंदरनगरमधील घटना : एकाच बंगल्यात दुसऱ्यांदा चोरी
मिरजेत बंगला फोडून ऐवज लंपास
शेतात अर्भक पुरले; प्रेमीयुगुलास अटक
आटपाडी : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे प्रेमसंबंधातून अपत्य झाल्यावर ते शेतात टाकून देणाऱ्या कुमारी मातेस आणि धनाजी सुखदेव गळवे (वय २३) या प्रेमवीरास आज सायंकाळी आटपाडी पोलिसांनी अटक केली.
धनाजी हा इयत्ता १0 वी पर्यंत शिकला आहे, तर या प्रकरणातील युवतीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यातून आलेल्या शरीरसंबंधातून युवती गरोदर राहिली. याची कुणकुण लागताच धनाजी याने तिच्याशी संबंध तोडले. मात्र ही युवती घरीच होती.
या प्रकरणातून सुटण्यासाठी धनाजीने दि. २८ सप्टेंबर रोजी गर्भपाताच्या गोळ्या आणून त्या एका मित्रामार्फत या युवतीपर्यंत पोहोचविल्या. गोळ्यांचे सेवन करताच दि. २९ सप्टेंबर रोजी पहाटे ही युवती प्रसूत झाली व मुलगा झाला. मात्र बदनामीच्या भीतीने या अर्भकाला शेतात एक खड्डा खणून तिथे टाकले होते. सध्या या बाळास सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी उपचारार्थ दाखल केले आहे. त्याची प्रकृती चांगली आहे. आज संबंधित युवती आणि धनाजी गळवे याला आटपाडी पोलिसांनी अटक केली. (वार्ताहर)