इस्लामपूरच्या नेताजी चव्हाणला ‘सर्वोत्कृष्ट कुस्तीगीर’चा बहुमान
By admin | Published: November 3, 2014 10:40 PM2014-11-03T22:40:28+5:302014-11-03T23:26:53+5:30
आॅलिम्पिक पध्दतीच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या
इस्लामपूर : कऱ्हाड येथील सह्याद्री सह. साखर कारखान्याच्यावतीने पी. डी. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आॅलिम्पिक पध्दतीच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेत राजारामबापू कुस्ती केंद्राच्या नेताजी चव्हाण याने ६0 किलो वजन गटात सलग पाच कुस्त्या जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल त्याला सह्याद्री कारखान्याचा ‘सर्वोत्कृष्ट कुस्तीगीर’चा बहुमान देण्यात आला. तसेच त्याला १ वर्ष मानधनही दिले जाणार आहे.
कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, जितेंद्र पवार, हिंदकेसरी संतोष वेताळ, कार्यकारी संचालक ए. आर. अहिरे, निवास जाधव यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन नेताजी चव्हाण याचा गौरव करण्यात आला. त्यााला राजारामबापू कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक,नजरुद्दीन नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. (वार्ताहर)