दुधेभावीत जिल्हा बँकेची नवीन शाखा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:23+5:302021-01-15T04:22:23+5:30
मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने दुधेभावी येथील कुटुंबांना प्रत्येकी पन्नास किलो बाजरीचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत हाक्के बोलत होते. ते ...
मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने दुधेभावी येथील कुटुंबांना प्रत्येकी पन्नास किलो बाजरीचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत हाक्के बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दुधेभावी तलावात टेंभूचे पाणी आले आहे. याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. पाण्यामुळे येथील शेतकरी मका, ऊस, डाळींब, भाजीपाला सारखी नगदी पिके घेऊ लागला आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत चालला आहे. शेतकऱ्यांचा अपेक्षा वाढू लागल्या आहेत. गावांतील लोकांची अपेक्षा होती की आपल्याही गावात जिल्हा बँक असावी. यासाठी सतत मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा बँक चेअरमन व अधिकारी यांच्यामार्फत नाबार्ड व रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून दुधेभावी शाखा मंजूर केली आहे. ही जिल्हयातील एकमेव नवीन मंजूर झालेली शाखा आहे. याचा लाभ दुधेभावीसह ढोलेवाडी, शिंदेवाडी, धोरपडी या गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.
यावेळी यांच्या हस्ते मकर संक्रातीच्या निमित्ताने दुधेभावी गावातील गरीब कुटुंबांना प्रत्येकी पन्नास किलो बाजरीचे वाटप करण्यात आले. मकर संक्रातीला बाजरीचे महत्त्व आहे. जी गावातील अल्पभूमी, भूमिहीन कुटुंबे आहेत त्यांनाही या सणाला बाजरी खाता यावी या हेतूने स्वतःच्या रानात पिकवलेल्या चार टन बाजरीचे वाटप करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून दर वर्षी ते मकर संक्रात सणाला बाजरी वाटप करतात.
यावेळी उपसरपंच प्रकाश हाक्के, शिवाजी देसाई, गोविंद खरात, भाऊसो फोडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, उपसरपंच प्रकाश हाक्के, भाऊसाहेब फोडे, नामदेव बंडगर, मेहबूब खाटिक, आकाराम हेगडे, लक्ष्मण चोपडे राजाराम काटे, पप्पू फोडे, धनाजी बंडगर पिंनू हाक्के, संजय दुधाळ, संजय पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती विकास हाक्के म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ गावातील नागरिकांनी घ्यावा. दुधेभावी ते ढालगांव मायाक्का मंदिर रस्त्यासाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच निमज ते आरेवाडी बन या रस्त्यासाठी तीन कोटी निधी मंजूर झाला आहे.