लसीकरणाची माहिती विचारून ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:23+5:302021-09-24T04:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आधार घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. देशभरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आधार घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. देशभरात ही टाेळी गंडा घालू लागली आहे. भामट्यांनी सांगितलेले बटन दाबताच मोबाईल हॅक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याबाबत सावधान राहावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारी टोळ्यांनी मोबाईलधारकांना सर्वाधिक टार्गेट केले आहे. सध्या बहुतांश आर्थिक व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून केले जात आहेत. त्यामुळे मोबाईल हॅक करून पैसे लुटले जात आहेत.आता लसीकरण झाले आहे का, याबाबत विचारणा करून मोबाईल हॅक केले जात आहेत.
चौकट
या कॉलला उत्तर देऊ नका
‘नमस्कार, मी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातून बोलत आहे. तुमचे लसीकरण झाले आहे का? पहिला डोस झाला असेल तर एक दाबा, दुसरा डोसही झाला असेल तर दोन दाबा’ अशा प्रकारचा संवाद असणारा कॉल येतो. ग्राहकांनी उत्साहाच्या भरात कोणतेही बटन दाबले तर तो मोबाईल ब्लॉक होऊन चोरांच्या ताब्यात जातो. त्यानंतर ऑनलाईन लूट केली जाते.
चौकट
मेसेजच्या माध्यमातूनही चोरटे दारात
मोबाईलवर अशाच पद्धतीचा लसीकरण माहितीचा मेसेज पाठवून सायबर गुन्हेगार लिंक पाठवित आहेत. ही लिंक ओपन केल्यानंतरही मोबाईल हॅक करण्याची पद्धत अवलंबिली जात आहे.
कोट
जिल्ह्यात आर्थिक साक्षरता अभियानाच्या माध्यमातून फसवणुकीचे नवनवे प्रकार लोकांसमोर मांडत आहोत. लसीकरणाची माहिती विचारून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार सुरू आहे. लोकांनी अशा कॉलला प्रतिसाद देऊ नये.
- लक्ष्मीकांत कट्टी, प्रमुख, आर्थिक साक्षरता केंद्र, सांगली
चौकट
जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या २०२० मधील घटना
ऑनलाईन बँकिंग फसवणूक ५
ओटीपीतून फसवणूक ६
डाटा चोरून फसवणूक १
अन्य पद्धतीने ऑनलाईन फसवणूक ९
एकूण सायबर गुन्हे ५७